विद्यार्थ्याची लक्षणे सांगताना सुभाषितकार सांगतात -
काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च। अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम्॥
विद्यार्थ्याची पाच लक्षणे आहेत -
कावळ्याप्रमाणे जलद हालचाल
बगळ्याप्रमाणे एकाग्र ध्यान
श्वानाप्रमाणे सावध निद्रा
अल्प आहार घेणारा अर्थात पोटभर आहार न घेणारा
घराचा त्याग करणारा अर्थात अनुभव प्राप्तीसाठी भ्रमंती करणारा
ही संपूर्ण लक्षणे ज्यात असतील तो आदर्श विद्यार्थी समजावा.
पुढे, सुखाचा त्याग करायला सांगताना सुभाषितकार सांगतात,
सुखार्थी वा त्यजेत विद्या विद्यार्थी वा त्यजेत सुखम्। सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम्॥
सुखाची इच्छा करणाऱ्याने विद्याभ्यास सोडावा किंवा विद्येची इच्छा करणाऱ्याने सुखाचा त्याग करावा; कारण सुख इच्छिणाऱ्याला विद्या कशी मिळेल आणि विध्यार्थ्याला सुख कसले?
सुभाषितकरांना येथे सांगावयाचे आहे की, भविष्यात सुख इच्छिणाऱ्याने वर्तमानात सुखात व्यस्त न राहता विद्याभ्यास करावा!
त्याचबरोबर आचार्य चरक म्हणतात, केवळ गुरूंवर विसंबून ज्ञान मिळत नाही, तर त्यासाठी दृष्टकर्मा व्हावे लागते, अर्थात वैद्यकीय कर्म प्रत्यक्ष पाहावे लागते आणि इतर वैद्यांसोबत चर्चा करावी, त्यालाच चरकाचार्य 'तद्विध संभाषा' म्हणतात, कारण म्हटलेच आहे -
आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया । पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ॥
विद्यार्थी आपले एक चतुर्थांश (१/४) ज्ञान गुरूंकडून, एक चतुर्थांश स्वतःच्या बुद्धीद्वारे, एक चतुर्थांश सहपाठकांकडून तर एक चतुर्थांश कालक्रमाने अर्थात अनुभवाने शिकतो. या Website द्वारे आम्ही प्रथमतः 'तद्विध संभाषा' परिषदेसाठी एक व्यासपीठ उभे करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच बरोबर गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानाला जोड म्हणून विविध विषयांवरील लेख, अनेक मान्यवर वैद्यांची व्याख्याने तसेच सर्व विषयांच्या Notes उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येथे करत आहोत. तेव्हा Sign Up करा आणि नियमित भेट द्या.
Comments