top of page

Motive of Website (उद्देश्य)

  • Apr 7, 2020
  • 1 min read

Updated: Jul 17, 2020

Modern विषयावर खूप संशोधन झालेले आहे. आंतरजालावर कुठल्याही Modern topic वर चुटकीसरशी माहिती सापडते. त्यामुळे खरंतर अभ्यासासाठी काही क्षणात ज्ञान उपलब्ध होते; परंतु आयुर्वेदीय ज्ञान हे अजूनही ग्रंथातच मर्यादित आहे, अर्थात ते अतिशय सटीक आणि सविस्तर उपलब्ध आहे, परंतु कोणताही विषय त्यात शोधायचा झाल्यास अनेक कष्ट करावे लागतात. सहजरित्या माहिती मिळत नाही. त्यासाठीच हा Digitizationचा घाट घातला आहे. संपूर्ण आयुर्वेदीय ज्ञान आंतरजालावर उपलब्ध व्हावे, ते शोधण्यास सोपे पडावे, तसेच त्याचा सर्व वैद्यांना तसेच आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न!


ree

अर्थात, अभियानाचा हा एक आरंभ असून सगळी माहिती एकदमच या Platform वर उपलब्ध होणार नाही आणि आपल्या सहयोगाशिवाय हे अजिबातच शक्य होणार नाही. कारण म्हणतात ना, 'गाव करी ते राव न करी'

जे कार्य सांघिकरित्या पार पडू शकते ते कितीही कष्ट केले तरी एकटा व्यक्ती करू शकत नाही. याच करिता सर्वांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी या कार्यात आपला सहयोग द्यावा. आपण खालील प्रकारे आपला सहयोग देऊ शकता, -

  • आपण आम्हाला आपल्याकडील साहित्य देऊ शकता, जसे - विविध ग्रंथ, आपल्याकडील Notes तसेच त्यांची छायाचित्रे (त्यासोबत आपले नाव आणि छायाचित्र द्यायला विसरू नका.)

  • आपण विविध विषयावर आपले मत मांडून चर्चा करू शकता आणि त्यावर Online Debate Complitation मध्ये सहभागी होऊन एक effective output काढू शकता.

  • आपल्याकडील माहिती आम्हाला लिहून किंवा Record करून पाठवू शकता.

  • तसेच आपण द्रव्य स्वरूपातही साहाय्य करू शकता.

तेव्हा लगेच आमच्याशी संपर्क करून आपण साहाय्य करू शकता. त्यासाठी खालील बटनावर दाबून अधिक माहिती मिळवा -








 
 
 

Recent Posts

See All
हरियाणा के तीर्थस्थल

मै जैसे ही कुरुक्षेत्र और पिहोवा दर्शन करके आया हु, मेरे दिमाग मे उसी स्थलों का विचार चल रहा था । मेरे इतिहास के अध्ययन मे जितने स्थल...

 
 
 

1 Comment


Unknown member
Sep 23, 2021

Can u write post in hindi because I don't know marathi 🙏🏻

Like
bottom of page