top of page

Search Results

18 items found for ""

  • आदर्श विद्यार्थी लक्षणे

    विद्यार्थ्याची लक्षणे सांगताना सुभाषितकार सांगतात - काकचेष्टा बकोध्यानं श्वाननिद्रा तथैव च। अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम्॥ विद्यार्थ्याची पाच लक्षणे आहेत - कावळ्याप्रमाणे जलद हालचाल बगळ्याप्रमाणे एकाग्र ध्यान श्वानाप्रमाणे सावध निद्रा अल्प आहार घेणारा अर्थात पोटभर आहार न घेणारा घराचा त्याग करणारा अर्थात अनुभव प्राप्तीसाठी भ्रमंती करणारा ही संपूर्ण लक्षणे ज्यात असतील तो आदर्श विद्यार्थी समजावा. पुढे, सुखाचा त्याग करायला सांगताना सुभाषितकार सांगतात, सुखार्थी वा त्यजेत विद्या विद्यार्थी वा त्यजेत सुखम्। सुखार्थिनः कुतो विद्या विद्यार्थिनः कुतो सुखम्॥ सुखाची इच्छा करणाऱ्याने विद्याभ्यास सोडावा किंवा विद्येची इच्छा करणाऱ्याने सुखाचा त्याग करावा; कारण सुख इच्छिणाऱ्याला विद्या कशी मिळेल आणि विध्यार्थ्याला सुख कसले? सुभाषितकरांना येथे सांगावयाचे आहे की, भविष्यात सुख इच्छिणाऱ्याने वर्तमानात सुखात व्यस्त न राहता विद्याभ्यास करावा! त्याचबरोबर आचार्य चरक म्हणतात, केवळ गुरूंवर विसंबून ज्ञान मिळत नाही, तर त्यासाठी दृष्टकर्मा व्हावे लागते, अर्थात वैद्यकीय कर्म प्रत्यक्ष पाहावे लागते आणि इतर वैद्यांसोबत चर्चा करावी, त्यालाच चरकाचार्य 'तद्विध संभाषा' म्हणतात, कारण म्हटलेच आहे - आचार्यात् पादमादत्ते पादं शिष्यः स्वमेधया । पादं सब्रह्मचारिभ्यः पादं कालक्रमेण च ॥ विद्यार्थी आपले एक चतुर्थांश (१/४) ज्ञान गुरूंकडून, एक चतुर्थांश स्वतःच्या बुद्धीद्वारे, एक चतुर्थांश सहपाठकांकडून तर एक चतुर्थांश कालक्रमाने अर्थात अनुभवाने शिकतो. या Website द्वारे आम्ही प्रथमतः 'तद्विध संभाषा' परिषदेसाठी एक व्यासपीठ उभे करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच बरोबर गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानाला जोड म्हणून विविध विषयांवरील लेख, अनेक मान्यवर वैद्यांची व्याख्याने तसेच सर्व विषयांच्या Notes उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न येथे करत आहोत. तेव्हा Sign Up करा आणि नियमित भेट द्या.

  • Motive of Website (उद्देश्य)

    Modern विषयावर खूप संशोधन झालेले आहे. आंतरजालावर कुठल्याही Modern topic वर चुटकीसरशी माहिती सापडते. त्यामुळे खरंतर अभ्यासासाठी काही क्षणात ज्ञान उपलब्ध होते; परंतु आयुर्वेदीय ज्ञान हे अजूनही ग्रंथातच मर्यादित आहे, अर्थात ते अतिशय सटीक आणि सविस्तर उपलब्ध आहे, परंतु कोणताही विषय त्यात शोधायचा झाल्यास अनेक कष्ट करावे लागतात. सहजरित्या माहिती मिळत नाही. त्यासाठीच हा Digitizationचा घाट घातला आहे. संपूर्ण आयुर्वेदीय ज्ञान आंतरजालावर उपलब्ध व्हावे, ते शोधण्यास सोपे पडावे, तसेच त्याचा सर्व वैद्यांना तसेच आयुर्वेद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न! अर्थात, अभियानाचा हा एक आरंभ असून सगळी माहिती एकदमच या Platform वर उपलब्ध होणार नाही आणि आपल्या सहयोगाशिवाय हे अजिबातच शक्य होणार नाही. कारण म्हणतात ना, 'गाव करी ते राव न करी' जे कार्य सांघिकरित्या पार पडू शकते ते कितीही कष्ट केले तरी एकटा व्यक्ती करू शकत नाही. याच करिता सर्वांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी या कार्यात आपला सहयोग द्यावा. आपण खालील प्रकारे आपला सहयोग देऊ शकता, - आपण आम्हाला आपल्याकडील साहित्य देऊ शकता, जसे - विविध ग्रंथ, आपल्याकडील Notes तसेच त्यांची छायाचित्रे (त्यासोबत आपले नाव आणि छायाचित्र द्यायला विसरू नका.) आपण विविध विषयावर आपले मत मांडून चर्चा करू शकता आणि त्यावर Online Debate Complitation मध्ये सहभागी होऊन एक effective output काढू शकता. आपल्याकडील माहिती आम्हाला लिहून किंवा Record करून पाठवू शकता. तसेच आपण द्रव्य स्वरूपातही साहाय्य करू शकता. तेव्हा लगेच आमच्याशी संपर्क करून आपण साहाय्य करू शकता. त्यासाठी खालील बटनावर दाबून अधिक माहिती मिळवा -

  • Why this Website?

    This website is Ideal for - YearWise study of Particular Subject. Study of Particular Topic with All References in One Post. Preparation of Quiz Competition or Questionnaire. To Collect information on Particular topic of Ayurveda. For bit Preparation of PG entrance Exam. For Discussion on Specific Topic of Ayurveda. For Knowledge by Debate on Specific Topic #WhyThis #Motive #WhyUs

bottom of page